मुंबई (प्रतिनिधी ) : बंजारा समाजाची संस्कृति, एकता, गीत, भजन, पारंपरिक शिकवणुक येणाऱ्या पिढीला व्हावी आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने प्रत्येकवर्षी कर्नाटकच्या विजापुर येथील श्री दुर्गादेवी मंदिराचे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. देशभरातील बंजारा समाजाचे प्रतिनिधी, अधिकारी, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ति या वार्षिक कार्यक्रमनिमित्त मोठ्याप्रमाणत सहभागी होतात. यंदा दुर्गा देवी मंदिराचे वर्धापन दिन २५ जून २०२५ रोजी विजापुर सोमदेवहट्टी तांडा १ येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दुर्गादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संत जागणू महाराज यांनी दिली. ते मुंबईत आयोजित एका वार्तालापमध्ये बोलत होते.
बंजारा समाजाचे धार्मिक गुरु संत जागणू महाराज म्हणाले की, देशभरातील भाविकांमध्ये उत्सुकता आहे. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री उदय सामंत, संजय राठोड, बी वाय विजेयंद्र, गृहराज्यमंत्री योगेश कदम, स्पीकर रुद्रपा लमानी, मंत्री डॉ एम बी पाटील, खासदार सुनील तटकरे, संजय दिना पाटील, उद्योजक डॉ शंकर पवार, आमदार मायकल लोबो यांच्यासह देशभरातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे दक्षिणेतील प्रसिद्ध गायिका तसेच पुष्पा चित्रपट फेम मंगली या गायिकेचे विशेष शो यावेळी आयोजित करण्यात आले आहे.
