ठाणे (प्रतिनिधी) : पुणे येथे पार पडलेल्या 73 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये 4 सुवर्ण, 3 कांस्य व 1 रौप्यपदक पटकावले. सर्व विजेते खेळाडू व प्रशिक्षण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
21 जून ते 23 जून या कालावधीत पुण्यातील शिव छत्रपती कॉम्प्लेक्स येथे 73 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेत ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंनी सुवर्णपदकासह कांस्य व रौप्य पदकावर आपले नाव कोरले. यामध्ये त्रिशा नायर. 5.56 मीटर लांब उडी घेत सुवर्ण पदक पटकावले. श्रेष्ठा शेट्टी हिने 5.29 मीटर लांब उडी घेत कांस्य पदक, पुरुषांमध्ये 400 मीटर धावणे. निखिल सुहास ढाके याने
48.15 सेकंदात अंतर पार करून सुवर्ण पदक पुरुष 110 मीटर हर्डल्स स्पर्धेत साहिल गेडाम 14.85 सेकंदांत कांस्य पदक, पुरुष 4बाय 100 मीटर रिले स्पर्धेत 42.39 सेकंदात पार करून हर्ष राऊत, अली शेख प्रतिक कोटीयन, निखिल ढाके यांनी रौप्यपदक, महिला 4 बाय100 मीटर रिले. 49.39 सेकंदात पार करत लीना धुरी, त्रिशा नायर, श्रेष्ठा शेट्टी, चार्वी पुजारी यांनी सुवर्णपदक, पुरुष गटात 200 मीटर धावणे यामध्ये निखिल सुहास ढाके याने 21.83 सेकंद. सुवर्णपदक,
पुरुष गटात 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धा 3:15.45 सेकंदात अली शेख, गिरिक बंगेरा, सुरज पाटील, निखिल एस ढाके यांनी सुवर्ण पदक तर महिलामध्ये 200 मीटर धावणे चारवी पुजारी 25.03 सेकंदात कांस्य पदकाची कमाई केली. 73 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेत खेळाडूंनी दिलेली उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्व पदक विजेते, प्रशिक्षक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.