ठाणे (कविराज चव्हाण ) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात प्रथमच मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबीर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि नगरसेवक वरुण पाटील यांच्या संयोजनातून झालेल्या या लोकहितकारी उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला.
या आरोग्यशिबिराला भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब,मा.म.मो.जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, १४२ कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे, मा परिवहन सभापती सुभाष म्हस्के, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड,मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, रितेश फडके, ठाणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी सदस्य डॉ प्रियंका यादव, महेश जोशी, प्रेमनाथ म्हात्रे, वैशाली पाटील, सचिन खेमा, दया गायकवाड,निवृत्त कमांडर सुनील कांबळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत, आरोग्य सेवेसाठी एक विधायक पाऊल!”हे उपक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या जाणीव संपन्न नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.या उपक्रमासाठी मेहनत घेतलेल्या सर्व डॉक्टर, स्वयंसेवक, आयोजक, आणि आरोग्य विभागाचे मनःपूर्वक आभार मानतो.