ठाणे (कविराज चव्हाण) : “मराठमोळं मुलुंड” आणि “महाराष्ट्र शासनाचा ठाणे कृषी विभाग ” यांच्या संयुक्त विद्यमाने मुलुंड मध्ये शनिवारी “रानभाज्या, कडधान्य व तृणधान्य (मिलेट) महोत्सव” आयोजन करण्यात आला होता.पावसाळ्यात विशेषता श्रावणात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत, व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट), कडधान्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी याही वर्षी मुलुंडकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
अडीच ते तीन तासात अर्ध्या अधिक भाजी विक्रेत्यांनी मुलुंड मधील नागरिकांना व मराठमोळं मुलुंड संस्थेच्या सभासदांना भाज्या विकून आयोजकांचे आभार मानून आनंदाने निरोप घेतला.संस्थेचे विश्वस्त व माजी आमदार शरद खातू यांच्या पत्नीने आलेल्या आदिवासी महिला विक्रेत्यांचा खणा नारळाने ओटी भरली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मराठा मंडळ मुलुंडचे अध्यक्ष रमेश जी शिर्के यांनी कार्यक्रमाची सुरुवात करून दिली.
शासनाच्या ठाणे कृषी विभागाचे कृषी सह संचालक बालाजी ताटे, प्रकल्प उपसंचालक ठाणे मनाली तांबडे,अधिकारी संजय गुडे यांच मोलाचं सहकार्य लाभलं,तसेच संस्थेचे सल्लागार, प्रसिद्ध पत्रकार, चित्रकार,प्रकाश बाळ जोशी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं,तसेच मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक उद्यान अधीक्षक “टि” विभाग.संदीप राऊत आणि कनिष्ठ वृक्ष अधिकारी अमोल शेलार यांचेही विशेष सहकार्य लाभले.रानभाज्या महोत्सवाला यशस्वी करण्यामागे प्रामुख्याने मराठमोळं मुलुंड संस्थेचे उपाध्यक्ष संजय माळी यांच मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभले.कार्यकारणी पदाधिकारी व सभासद, सचिव मीरा पत्की, सह सचिव – गीताली देशमुख सोनी ठाकूर, नेहा गोगटे, रेखा ताम्हाणे, मुकुंद वडावकर, कार्यालयीन प्रमुख सतीश दामले, सदाशिव सारंग, मयूर फाळे, संजय नागपुरे,भालेराव,कोषाध्यक्ष -.प्रमोद देसाई) यांनी योगदान दिले. या उपक्रमाला मुलुंड मधील विविध राजकीय क्षेत्रातील नेते पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थिती दिली, त्यामध्ये माझी खासदार मनोज कोटक, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नंदकुमार वैती. तसेच मुलुंड मधील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.