ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील दिघा प्रभागातील दहावी – बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी नगरसेवक नवीन गवते यांनी टॅब, महाविद्यालयीन बॅग तसेच जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी दिघा विभाग प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 9 यांच्या तर्फे दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी नगरसेवक नवीन जी गवते यांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन दिघा येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी टॅब, महाविद्यालयीन बॅग तसेच जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप देखील याठिकाणी करण्यात आले.