ठाणे (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत, रविवारी १० ऑगस्ट रोजी मानपाडा मंडळा तर्फे भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
हा देशभक्तीचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार.संजय केळकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे व जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप लेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.प्रभाग क्र. ४ च्या मा. नगरसेविका स्नेहाताई रमेश आंब्रे आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक यांच्यासह उपस्तिथ राहून उत्साहाने सहभाग घेतला. तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा आणि अभिमानाचा प्रतीक – चला, तो प्रत्येक घरात फडकवूया! असे आवाहन रमेश आंब्रे यांनी यावेळी केले.