ठाणे (प्रतिनिधी) : श्री गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. या पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवाच्या स्वागतासाठी, ठाणे शहर भारतीय जनता पार्टी आणि जनकल्याण फाउंडेशनवतीने नागरिकांना गणेश चतुर्थी प्रतिष्ठापना पूजा साहित्य वाटप करण्यात आले. या पावन उपक्रमात भाजप नेते आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डावखरे यांच्या हस्ते पूजा साहित्य वाटप करण्यात आले.
भाजप नेते आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, या उपक्रमात सहभागी होण्याचा मला मनःपूर्वक आनंद झाला. गणपती बाप्पा मोरया… सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो” हीच मंगलकामना आहे. जनकल्याण फाउंडेशनच्या सचिव अंकिता अक्षय तिवरामकर आणि अध्यक्ष व ओवला-माजिवडा विधानसभा सहसंयोजक अक्षय तिवरामकर यांनी हा उपक्रम सुंदरपणे आयोजित करून समाजबंध दृढ केला असल्याचे डावखरे यावेळी म्हणाले.