ठाणे (प्रतिनिधी) : डोंबिवली शिवसेना शाखेत शेकडो महिलांनी आमदार राजेश मोरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळेस लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार मोरे यांनी विधानसभेप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणी महायुतीला भरभरून आशीर्वाद देतील.
आमचे सरकार आणि मी स्वतः या लाडक्या बहिणींच्या मागे असल्याचे मोरे यांनी सांगितले. तर वरळीमध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी बोलताना राजेश मोरे यांनी या विरोधकांना सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेचे काही पडलं नाही. ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळेस केली आहे.