ठाणे (प्रतिनिधी) : हर घर तिरंगा या अभियान अंतर्गत बुधवारी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानामधील महात्मा गांधींच्या प्रतिमेची स्वच्छता करून त्यांना पुष्पांजली वाहण्यात आली. सदर कार्यक्रमास भाजपा ठाणे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे,संजय वाघुले, रक्षा यादव,युवा मोर्चाचे सुरज दळवी, नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, कार्यक्रम प्रभारी सागर पिसाळ, कार्यक्रम संयोजक कैलास म्हात्रे,प्रशांत कळंबटे आदी मान्यवर उपस्थित होते.