ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण ग्रामीण शहर प्रमुख अमित संभाजी कोलेकर यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अनावरण तसेच भुमी कॉम्प्लेक्स येथील मुख्य रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण व अनावरण कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून विष्णुशेट गायकवाड (माजी नगरसेवक), महेश गायकवाड (माजी नगरसेवक) आणि विजय भाणे (विभागप्रमुख) उपस्थित होते.
आमदार राजेश मोरे यावेळी म्हणाले की, समाजासाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना तातडीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर भुमी कॉम्प्लेक्स परिसरातील मुख्य रस्ता सुरु झाल्यामुळे वाहतुकीची सोय सुलभ होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार असल्याचे मोरे यावेळी म्हणाले.या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. MLA rajesh more