ठाणे (प्रतिनिधी) : रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समन्वयांच्यावतीने धर्मरक्षाबंधन घेण्यात येतो. आपण सगळे हिंदू समाज एकत्र राहून एकमेकांच्या मदतीने समाजाचा विकास करूया या भावनेने प्रत्येक वर्षी मोठ्याप्रमाणात धर्मरक्षाबंधन कार्यक्रम धर्मजागरणच्यावतीने राबविण्यात येतो. त्याचाच एक भाग म्हणून शास्त्रीनगर येथे धर्मरक्षाबंधन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंजारा समाजाच्या प्रमुख स्वयंसेवक एकत्र येत हे धर्मरक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे केले.
बंजारा समाजाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी आजचा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केले आहे आणि हे श्रीराम भगवानाची राखी आम्ही एकतेचा प्रतीक म्हणून बांधत असल्याचे कामगार नेते जोरसिंग पवार यावेळी म्हणाले. यावेळी आत्माराम जाधव, बद्रु राठोड, शिवा चव्हाण, बाबू जाधव, रवी चव्हाण, सोमनाथ राठोड, रवी जाधव, हनुमंत राठोड, राजू राठोड, मोहन राठोड, मोहन जाधव, रतन जाधव, मुलचंद चव्हाण, रामेश्वर चव्हाण, चेगा राठोड, खपूरा राठोड यांनी रक्षासूत्राचे यावेळी वाटप केले आणि आम्ही सर्व एकत्र राहणार असल्याचे त्यांनी यावेळी संकल्प केले.
धर्मजागरणच्या माध्यमातून बंजारा समाजाची संस्कृती, बंजारा समाजाचे विचार आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही एकत्र राहणार असल्याचा संकल्प यावेळी बंजारा समाजाच्या नागरिकांनी यावेळी केला.