शेकडो महिलांनी घेतला सहभाग, आपली परंपरा जपण्याचे केले संकल्प
ठाणे (प्रतिनिधी) : बंजारा परंपरेतील सर्वात महत्वाचा असलेला तिज उत्सव ठाण्यातील पातलीपाडा डोंगरीपाडा येथे गणेश मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात. त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते. इसवी सन पूर्वपासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा तीज उत्सव डोंगरीपाडा येथील गणेश मंदिरात करण्यात आला.

ठाण्यातील पातलीपाडा येथे राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तिज उत्सवाची पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातलं आहे. पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी झाल्या. पातलीपाडा येथे राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा,लोकसंस्कृती आणि वेगळेपण जपल्याचे यानिमित्ताने दिसून आले.नायक रणजीत राठोड, कारभारी रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते नारायण आडे, लहू राठोड, सावन जाधव, पत्रकार अनिल जाधव यांचे कार्यक्रम आयोजनात मोठे योगदान लाभले. तांडा समृध्दी योजनेचे ठाणे जिल्हा प्रमुख अनिल राठोड यांनी उपस्थियांना शुभेच्छा दिल्या.

विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य धर्मदाय रुग्णालय देखरेख समितीचे मुंबई विभाग प्रतिनिधी कविराज चव्हाण म्हणाले की, महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृ शक्तीला वंदन करणारा असून आपली संस्कृती येणाऱ्या पिढीला कळविण्याचे एक मोठे माध्यम हे महोत्सव असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.