मुंबई (प्रतिनिधी ) : भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा महिला आघाघीतर्फे स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून सर एली कदुरी हायस्कूल, माझगाव ताडवाडी येथे श्रावण महोत्सव २०२५ अंतर्गत भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर तसेच शिवसेना उपविभाग संघटिका व माजी नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांनी उपस्थिती दर्शवली.
या स्पर्धेत महिलांनी उत्साहाने विविध स्वादिष्ट व पारंपरिक पदार्थ सादर केले. सहभाग घेतलेल्या सर्व माता-भगिनींना आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर यांनी मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर, मा. आमदारांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन भायखळा विधानसभा शाखा क्र २१० च्या महिला शाखा समन्वयक सौ. विद्या राभडीया यांनी केले होते. त्यांच्या स्तुत्य प्रयत्नांचे आमदार महोदयांनी विशेष कौतुक केले तसेच या कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून ओमकार माळी, जुईली भुजबळ यांनी जबाबदारी पार पाडली यांचे सुद्धा आभार मानले.
यावेळी सोबत विधानसभा संघटक सौ चंदना साळुंके, उपविभागप्रमुख राम सावंत, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, सहसंघटक सुर्यकांत पाटील, महिला सहसंघटक उषाताई पाटोळे, शिल्पा जाधव, शाखाप्रमुख रमेश रावल,शाखा समन्वयक रमेश चेंदवणकर ,महिला शाखा समन्वयक शिल्पा म्हात्रे, मनीषा जांभरे ,मुंबई युवासेना मुंबई समन्वयक सिद्देश मंडलिक , कार्यालय प्रमुख प्रमोद लाड, महिला उपशाखा संघटिका,शिवसैनिक व महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.