ठाणे (प्रतिनिधी ) : भाजप पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील लाडक्या बहिणींकडून हजारो राख्या पाठविल्या असून ठाणे जिल्ह्यातून देखील हे अभियान राबविण्यात आले आहे. ठाणे भाजपा मध्यवर्ती कार्यालयात मुख्यमंत्री रक्षाबंधन अभियानाअंतर्गत राखी प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, भाजप प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, मा. खासदार संजीव नाईक, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदिप लेले, व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर,उपस्थित होते.
ठाणे भाजप महिला मोर्चा सरचिटणीस नीता पाटिल म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ “रक्षाबंधन अभियान” अंतर्गत लाखो महिलांनी राख्या पाठविल्या.यावेळी “कळवा मुंब्रा विधानसभा प्रभारी “म्हणून रक्षाबंधन अभियानाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होतीत्यावेळी संपूर्ण कळवा मुंब्रा विधानसभेतून जवळपास 13 हजार भगिनींनी राख्या पाठवण्यात सहभाग घेतला असल्याचे पाटिल यावेळी म्हणाल्या.