ठाणे (प्रतिनिधी) : धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि ज्यूपिटर हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी ठाणे येथे एक दिवसीय लहान मुलांचे हृदयाचे छिद्राचे मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्ताने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लहान मुलांची (0 ते 18 वयोगटातील ) मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. मोफत प्राथमिक तपासणी झाल्यानतंर हदयाला छिद्राचे निदान झालेल्या लहान मुलांवर महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे लहान मुलांची मोफत 2D इको कार्डीओलाेजी, कार्डीक सर्जरी कंन्सल्टेशन, जन्मतः हदयाला छिद्र असणा-या मुलाची मोफत शस्त्रक्रिया, आेपन हार्ट सर्जरीची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुलांना या शिबिरात लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंगेश चिवटे ( मंबई 9423902525 ), उमेश शिरोडकर : 9082254517 आणि माऊली धुळगंडे भ्रमणध्वनी 8208284440 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
