ठाणे (कविराज चव्हाण) : भारतीय जनता पार्टी, राबोडी मंडळातर्फे प्रभागातील नागरिकांना आरोग्य सुविधांमध्ये सवलत मिळावी म्हणून आभा कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते कार्ड वाटप सोहळा रविवारी श्रीराम गणेश उत्सव मंडळ मंडप, लक्ष्मण पाटील चौक, दुसरी राबोडी, ठाणे येथे उत्साहात पार पडला.
दिनांक 19, 20, 26 व 27 जुलै रोजी झालेल्या शिबिरातून निवड झालेल्या लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप आमदार संजयजी केळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले असल्याचे ठाणे भाजप चिटणीस दिलीप कंकाळे यावेळी म्हणाले. या आभा कार्ड शिबिराचे आयोजन दिलीप कंकाळे, ठाणे भाजप शहर चिटणीस दिलीप कंकाळे, ठाणे भाजप शहर उपाध्यक्ष प्रवीण रानडे, सचिव योगेश भोईर यांनी केले होते.
राबोडी प्रभागातील नागरिकांना आभा कार्ड वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी आघाडी भाजप ठाणे शहर अध्यक्ष सुरेश पाटील, श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजेंद्रजी पाटील, भाजप राबोडी मंडळ उपाध्यक्ष साईराज पराडकर, श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खजिनदार आनंदजी वावड तसेच संतोष मोरे, अभिषेक कोळीवाडे, विनोद पवार व भाजप कार्यकर्ते, लाभार्थी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.