ठाणे (कविराज चव्हाण) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते तथा विधिमंडळ गटनेते सन्मा. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान साहेब यांच्या आदेशाने आज ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील ओला कंपनीच्या (OLA) सर्व्हिस सेंटरला धडक दिली. ओला कंपनीच्या निकृष्ट आणि ढिसाळ कारभाराविरोधात ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत यावेळी व्यवस्थापनाला धारेवर धरण्यात आले.ओला कंपनीकडून ग्राहकांना गाड्या वेळेत दुरुस्त करून न देणे, तसेच आवश्यक असणाऱ्या सुट्या पार्टस्चा (Spare Parts) सततचा तुटवडा यामुळे ग्राहकांना होणारा मानसिक त्रास आणि निकृष्ट दर्जाची सेवा या गंभीर समस्यांवर यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला.यावेळी, येत्या आठवड्याभरात ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आल्या.
तीव्र आंदोलन आणि कायदेशीर कारवाईचा इशारा
समस्यांची तातडीने दखल न घेतल्यास, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, तसेच कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी तंबीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी यावेळी देण्यात आली.या आक्रमक भूमिकेनंतर, ओला कंपनीच्या व्यवस्थापनाने सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. यापुढे ग्राहकांना उत्तम आणि जलद सेवा पुरवण्याचे वचनही त्यांनी दिले.याप्रसंगी इक्बाल शेख,राजेश साटम,केतन जेधे,महेश भाग्यवंत, साहिल उदुगडे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.