ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या मागणीनुसार कोलशेत येथील आशर गृह संकुलातील परवडणारी 56 घरे ठाणे शहर व जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आली होती ती आज लॉटरीमध्ये जाहीर करण्यात आली.सदर घरांची किंमत 42.लाख 50 हजाराच्या दरम्यान असल्याने ती पत्रकारांना परवडणारी नसून त्याची किंमत कमी करण्याची मागणी केली असता म्हाडाचे उपाध्यक्ष माननीय संजीवजी जयस्वाल साहेब यांनी ती रक्कम 50 टक्के केल्यामुळे ठाण्यातल्या पत्रकारांच्या घराचा मार्ग मोकळा झाला होता.
सदरची घरांची किंमत जयस्वाल साहेब यांनी कमी केल्यामुळे ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या विनंती वरून आज लॉटरी दरम्यान त्यांना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोकण म्हाडाच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील घरांची लॉटरी ची सोडत काढण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक खासदार नरेशजी म्हस्के यांच्यासह कोकण माडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल,ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ ,म्हाडाच्या कार्यकारी अधिकारी रेवती गायकर यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, सहभाग घेतलेले नागरिक, पत्रकार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.