अमेरिकेत संयुक्त राष्ट्र संघ मुख्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
न्यूयॉर्क : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण जगाला प्रेरणदायी आहेत.संयुक्त राष्ट्र संघाचे जगाच्या शाश्वत विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दिलेला समता स्वातंत्र्य बंधुता आणि मानवतेचा विचार मार्गदर्शक ठरणारा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे समतेचा मानवतेचा दीपस्तंभ आहे.संपूर्ण विश्वाला सामाजिक न्यायाचा मार्ग दाखविणारे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संयुक्त राष्ट्र संघात आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून रामदास आठवले यांनी आपले विचार मांडले.
अमेरिका दौऱ्यात रामदास आठवले यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले;पुत्र जीत आठवले हे सोबत आहेत.अमेरिकेतील भारताचे कॉन्स्युल जनरल श्रीकांता प्रधान; युनोचे भारतचे प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी ना.रामदास आठवले यांचे युनायटेड नेशन्स च्या न्यूयॉर्क मधील मुख्यालयात स्वागत केले.

न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस न्यूयॉर्क मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून साजरा करणारा आल्याची घोषणा रामदास आठवले यांच्या उपस्थितीत केली.यावेळी अमेरिकेतील आंबेडकरवादी कार्यकर्ते दिलीप म्हस्के आणि दीपक बन्सल यांनी रामदास आठवले यांचे स्वागत केले. अमेरिकेतील लाखो लोकांनी यंदा 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमीत्त अमेरिकेत भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल अमेरिकेत अनेक मान्यवरांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
न्यूयॉर्क मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात यंदा साजरी झालेली भीम जयंती ऐतिहासिक ठरली आहे.अमेरिकेतील भारतीयांना नवी उर्मी ताकद प्रेरणा देणारी भीम जयंती ठरली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जगाला प्रेरणा देणारा विचार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने साजऱ्या केलेल्या भीम जयंती मुळे चिन्हांकित झालेल्या आहे याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. 18 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अमेरिका गाजवून भारतात परतत आहेत. त्यांचे उद्या 18 एप्रिल सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.