• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Monday, August 25, 2025
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home मुंबई

वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन

News Disha by News Disha
July 2, 2025
in मुंबई
0
वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 12

मुंबई (प्रतिनिधी) : वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे शासकीय व वाहतूकदार प्रतिनिधी यांच्या समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना देखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देणार आहे. यासाठी उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहन मंत्री.सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, पोलीस अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे, सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, परिवहन सहआयुक्त रवी गायकवाड, पोलीस अधीक्षक (महामार्ग) सुनिल भारद्वाज उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करणेसाठी गठित समितीवर ट्रक, टँकर व इतर वाहतूकदारांचे प्रतिनिधी देखील घेण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे. व्यापार वाढल्याने विकासास चालना मिळते. वाहतूकदारांचा विकासात महत्त्वाचा सहभाग असून त्यांच्या व्यवसायास संरक्षण देणे हे शासनाचे काम आहे.
शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, विशेषतः मुंबई शहरातील खासगी प्रवासी बसेस, स्कूल व्हॅन, माल ट्रक, टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल. परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना दिल्या आहेत, असे परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

राज्यमंत्री.कदम म्हणाले, मुंबई शहरात खासगी प्रवासी बस व स्कूल बस यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे. बेस्ट बसेसच्या पार्किंगच्या जागा, हजारोंच्या संख्येने असलेल्या बसेस साठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नगरविकास, गृह व परिवहन विभागाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्यात येईल. ई- चलानबाबत तक्रारीची दखल घेऊन यावेळी गृह विभागास सूचना दिली.अपर मुख्य सचिव.चहल व परिवहन आयुक्त भीमनवार यांनी यावेळी माहिती सादर केली.
वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बैठकीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, मुंबई बस मालक संघटना, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर, स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ट्रक लोरी ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र हेवी वेहिकल इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, वाहतूकदार बचाव कृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: Transport vehicles strike pratap sirnaik
Previous Post

मुंबई ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉज

Next Post

फळपिक विमा योजनेस अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ : कृषिमंत्री

Next Post
फळपिक विमा योजनेस अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ : कृषिमंत्री

फळपिक विमा योजनेस अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ : कृषिमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • एल अँड टी फायनान्स लिमिटेड आणि गुगल पे यांची भागीदारी
  • कल्याण-शिळफाटा वाहतूक कोंडी संदर्भात आमदार राजेश गोवर्धन मोरेंकडून पाहणी
  • ज्येष्‍ठ नागरिकांसाठी ठाण्यात एल्‍डर्ली केअर सेवांचा शुभारंभ
  • आयटी सेक्टर, नवीन स्टार्ट-अप्ससाठी मराठी मुलांना घडवणार
  • लहान मुलांच्या हृदयाच्या तपासणीसाठी ठाण्यात विशेष शिबिर

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777