मुंबई (प्रतिनिधी): आज माझ्या दहिसर विधानसभेतील वॉर्ड क्रमांक १० मधील पॅराडाईस हॉल, बोरीवली (पश्चिम) येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ आहे. त्यामुळे अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मदतच नव्हे, तर प्रोत्साहन, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन आमदार मनिषा चौधरी यांनी रविवारी केले. रविवारी आमदार चौधरी यांनी दहिसर येथे वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या की, अनेक कुटुंबांसाठी शालेय साहित्याची खर्चिक तयारी ही एक मोठी चिंता असते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही राबवलेला हा उपक्रम म्हणजे “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा छोटासा पण ठोस प्रयत्न” आहे. शिक्षणाचा दीर्घकालीन फायदा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे, हेच या मागील उद्दिष्ट असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
या उपक्रमात माझ्यासोबत दहिसर पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम, माजी मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक म्हात्रे, वॉर्ड अध्यक्ष कुश ढेबर, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान पाहून हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण वाटला असल्याच्या चौधरी यावेळी म्हणाल्या. त्याचप्रमाणे “शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके नव्हे, तर एक दिशा, एक प्रेरणा आणि समाज विकासाची मजबूत पायरी!” असल्याचेदेखील त्या यावेळी म्हणाल्या.

