ठाणे ( कविराज चव्हाण) : भारत-पाकिस्तान फाळणीच्या भयंकर आणि हृदयद्रावक स्मृतिंचा, लाखो निरपराधांचे आयुष्य उध्वस्त करणारा काळा दिवस.१९४७ साली १४ ऑगस्ट रोजी देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय लिहिला गेला. फाळणीच्या दुर्दैवी निर्णयामुळे लाखो बहिणी-भावंडांना व देशवासीयांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने १४ ऑगस्ट हा दिवस “विभाजन विभीषिका स्मृतिदिन”म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने “मूक मोर्चा-पदयात्रा व संवाद सभेचे” आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अन्याय व जुलमी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
इतिहासातील सर्वात क्रूर प्रसंगादरम्यान ज्यांनी अमानवीय यातना सहन केल्या व मातृभूमी सोडताना प्राण गमावलेल्या लाखो निष्पाप बंधू-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मोर्च्यात कोणत्याही पक्षाचे झेंडे, लेबल किंवा घोषणाबाजी न करता शांततेत सर्वांनी सहभागी होऊन या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून पदयात्रेला सुरुवात झाली ते तामिळ संघ हॉल (सेक्टर 9A)येथे सांगता झाली. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, प्रमुख वक्ते महेश सुखरामाणी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, अनिल कौशिक, राजू शिंदे, संपत शेवाले, निलेश म्हात्रे, अभिजीत पेडणेकर, दत्ता घंगाले, कृष्णा पाटील, मंडळ अध्यक्ष, तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.