ठाणे (प्रतिनिधी) : 15 ऑगस्ट 2025 रोजी भास्कर कॉलनी अभिनंदन कट्टा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम तसेच भारत माता पूजन संपन्न झाले. डॉ. राजेश मढवी फाउंडेशन, स्वराशी नेत्रालय व विनस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर ,वीनस हॉस्पिटल तर्फे आरोग्य शिबिर पार पाडण्यात आले. त्याचबरोबर सोसायट्यांना डस्टर बीन डब्यांचे वाटपही करण्यात आले. सदर कार्यक्रमास आमदार निरंजनजी डावखरे, मा. नगरसेवक प्रतिभा राजेश मढवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, सुजय पतकी,मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी,हिमांशू रजपूत, जयप्रकाश सिंग रक्षा यादव आदी मान्यवर उपस्थित होते. Dr Rajesh madhvi foundation medical camp