ठाणे (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रौप्य महोत्सवी सोहळा दिमाखात पार पडला, गेले २५ वर्षे आर्थिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या या संस्थेचा हा गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री गणेश नाईक म्हणाले की, “कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेने गेल्या २५ वर्षांत केवळ आर्थिक व्यवहारच नाही, तर विश्वास आणि आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. संस्थेचे संस्थापक, संचालक, कर्मचारी वर्ग आणि सभासद यांच्या मेहनतीमुळेच आज ही संस्था यशाच्या शिखरावर पोहोचली असल्याचे नाईक यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी, संस्थेच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी संचालकांचा आणि सभासदांचा सत्कार करण्यात आला.