• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Saturday, August 23, 2025
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home मुंबई

पालकांना दिलासा ; लवकरच सुधारित विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली : प्रताप सरनाईक

News Disha by News Disha
August 21, 2025
in मुंबई
0
ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 3,813

मुंबई (प्रतिनिधी ) : शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकार, सह परिवहन आयुक्त जयंत पाटील आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सादरीकरण केले.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी. स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि वर्षाच्या १० महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे. नियमावली मध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे.

देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BS-VI या श्रेणीतील असतील. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश आहे, असेही यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन मंत्री म्हणाले, स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

अशी असेल स्कूल व्हॅन

– जीपीएस- सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन- अग्निशमन अलार्म प्रणाली- दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा- ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर- पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे- स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी- गाडीच्या छतावर शाळेचे नाव

Tags: Pratap sarnaikSchool van rules will change soonपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकप्रताप सरनाईक
Previous Post

कल्याण डोंबिवलीतील तीन नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

कळवा – मुंब्रामधून मुख्यमंत्र्यांना १३ हजार राख्या

Next Post
कळवा – मुंब्रामधून मुख्यमंत्र्यांना १३ हजार राख्या

कळवा - मुंब्रामधून मुख्यमंत्र्यांना १३ हजार राख्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • एल अँड टी फायनान्स लिमिटेड आणि गुगल पे यांची भागीदारी
  • कल्याण-शिळफाटा वाहतूक कोंडी संदर्भात आमदार राजेश गोवर्धन मोरेंकडून पाहणी
  • ज्येष्‍ठ नागरिकांसाठी ठाण्यात एल्‍डर्ली केअर सेवांचा शुभारंभ
  • आयटी सेक्टर, नवीन स्टार्ट-अप्ससाठी मराठी मुलांना घडवणार
  • लहान मुलांच्या हृदयाच्या तपासणीसाठी ठाण्यात विशेष शिबिर

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777