किम्स हॉस्पिटल, ठाणे आणि इमोहा एल्डरकेअरचा उपक्रम
मुंबई (कविराज चव्हाण) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्स आणि भारतातील आघाडीचे जेरियाट्रिक केअर ब्रँड इमोहा यांनी ठाणे क्षेत्रातील वृद्धांची काळजी घेण्याला प्रथम प्राधान्य देण्यासाठी महत्त्वपूर्ण सहयोगाची घोषणा केली. २०० ज्येष्ठ ठाणेकरांसाठी एल्डर्ली केअर सेवांचा शुभारंभ करण्यात आला. किम्स हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सुपर स्पेशालिटी कॅम्प सुरू झाल्यानंतर ते एकत्रितपणे सर्वांगीण केअर परिसंस्था तयार करत आहेत जी शारीरिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या देखील ज्येष्ठांना आधार देते, प्रत्येक आई-बाबाला सुरक्षित, साह्य मिळत असल्याचे व काळजी घेतले जात असल्याचे वाटण्याची खात्री घेते.
ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्समध्ये जेरियाट्रिक केअर पार्टनर म्हणून इमोहा वृद्धांना त्यांच्या अद्वितीय आणि अनेकदा गुंतागूंतीच्या आरोग्य गरजांनुसार विशेष वैद्यकीय मदत देईल. हा सहयोग हॉस्पिटल आणि घर यांच्यातील महत्त्वाची तफावत दूर करतो. किम्स हॉस्पिटल्समधून डिस्चार्ज मिळालेल्या वृद्धांना घरीच तज्ञ वैद्यकीय सहाय्य मिळेल आणि सहानुभूतीने त्यांची काळजी घेतली जाईल, ज्यामुळे पुन्हा आजारी पडण्याचा, हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल होण्याचा आणि मानसिक त्रास होण्याचा धोका कमी होईल. इमोहाचे प्रशिक्षित काळजीवाहक आणि नर्सिंग टीम वृद्धांना औषधे वेळेवर देणे आणि जीवनावश्यक गोष्टींचे निरीक्षण करण्यापासून दैनंदिन आरोग्य गरजा पूर्ण करण्यास मदत करतील, ज्यामुळे वृद्ध त्यांच्या घरी आरामात जलद बरे होण्याची खात्री मिळेल.या काळजी घेण्याचे भावनिक परिणाम देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.
इमोहा अॅपच्या माध्यमातून वृद्ध देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साही समुदायाच्या संपर्कात राहतील, आनॅलाइन मालिका पाहण्याचा, परस्परसंवादात्मक सत्रांचा आणि सर्वोत्तम इव्हेण्ट्सचा आनंद घेतील, जे त्यांच्या दैनंदिन जीवनात आनंद, हेतू आणि सहवास आणतील. इमोहाचा समुदाय-केंद्रित दृष्टिकोन आणि स्थानिक उपस्थितीमधून वृद्ध सक्रिय, कनेक्टेड राहण्याची आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये व समदुायांमध्ये त्यांना महत्त्व दिले जात असल्याची खात्री मिळते.
“या लाँचसह ठाणे येथील किम्स हॉस्पिटलला वृद्धांची काळजी घेणाऱ्या उपक्रमामध्ये अग्रणी असण्याचा अभिमान आहे, जो हॉस्पिटलबाहेर देखील सुविधा देतो. हा उपक्रम खात्री देतो की ठाणेमधील प्रत्येक वृद्धाकडे दर्जात्मक वैद्यकीय लक्ष दिले जाईल, त्यांना घरामध्ये वैयक्तिकृत काळजी आणि मानसिक आरोग्याबाबत पाठिंबा मिळेल. इमोहासोबतचा आमचा सहयोग प्रांतामधील वृद्धांची काळजी घेण्यासाठी परिवर्तनात्मक प्रवासाची सुरूवात आहे,” असे किम्स हॉस्पिटल्सचे प्रादेशिक सीओओ सौरभ गुप्ता म्हणाले.