ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण-शिळफाटा हा ठाणे, मुंब्रा, नवी मुंबई तसेच डोंबिवली-कल्याण शहरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग असून पलावा, एक्सपेरिया मॉल, खिडकाळी व देसाई गाव परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेला रस्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या मार्गावरील ट्रॅफिक जामची समस्या अत्यंत गंभीर स्वरूप धारण केली आहे.या समस्येची तातडीने दखल घेत कल्याण ग्रामीण आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी शुक्रवारी कल्याण फाटा जंक्शन चौकी येथे भेट पाहणी केली आणि यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली.
या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात तेथील पोलीस चौकीत भेट देऊन मुंब्रा वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ट्रॅफिक) अतुल आहीर यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तात्काळ उपाययोजना करणे तसेच या मार्गावर ट्रैफिकचा तान कसा कमी होईल आणि योग्य तो मार्ग कसा निघेल यावर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपतालुका प्रमुख रोहिदास म्हात्रे, सुनील पवार, वैभव अळीमकर, गणेश जयपाल (उपतालुका प्रमुख) बाबुराव पाटील (शाखा प्रमुख), किसन जाधव, दीपेश पाटील (उपविभाग प्रमुख), अनिल पाटील (उपशाखा प्रमुख) तसेच कार्यकर्ते व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या वाहतुकीस अडथळा दूर व्हावा ही भूमिका आमदार राजेश मोरे यांनी स्पष्ट केली.