मुंबई (प्रतिनिधी) : एल अँड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ), पूर्वी एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी आणि देशातील आघाडीच्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक, हिने गुगल पेसोबत भागीदारी करून पात्र वापरकर्त्यांना गुगल पे प्लॅटफॉर्मद्वारे वैयक्तिक कर्ज उत्पादने उपलब्ध करून दिली आहेत. ही भागीदारी एलटीएफच्या उत्पादन विविधीकरण धोरणाशी सुसंगत असून ग्राहकांसाठी जलद, सुलभ आणि डिजिटल स्वरूपात कर्ज अधिक सहज उपलब्ध करून देते.
भागीदारीबद्दल बोलताना एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदीप्त रॉय म्हणाले, “वित्तीय सेवांचे भविष्य म्हणजे सामर्थ्यवान, ग्राहक-केंद्रित परिसंस्था निर्माण करणे. गुगल पेसोबतच्या आमच्या सहकार्यामुळे आम्ही भारतीय ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याची क्षमता वाढवत आहोत. आम्ही आमची वित्तीय उत्पादने उच्च सहभाग असलेल्या परिसंस्थांमध्ये एकत्रित करत आहोत, ज्यामुळे वितरण मॉडेल अधिक कार्यक्षम होईल आणि आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षांना अनुरूप राहील
”या भागीदारीबद्दल एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह – अर्बन अनसिक्योर्ड अॅसेट्स, पेमेन्ट्स अँड डिजिटल पार्टनरशिप्स मनीष कुमार गुप्ता म्हणाले, “गुगल पेसोबतची भागीदारी आमच्यासाठी डिजिटल नेटिव्ह कर्जदाता होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एलटीएफमध्ये आमचे लक्ष ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर आहे. गुगल पेचा शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यापक वापरकर्ता वर्ग आमच्या ‘लक्ष्य’ धोरणाशी सुसंगत आहे. या सहकार्यामुळे वैयक्तिक कर्ज क्षेत्रातील आमची स्थिती आणखी मजबूत होईल असा आम्हाला विश्वास आहे.”