ठाणे (कविराज चव्हाण) : कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून कल्याण लोकसभेत मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात येते. यंदाही याच पद्धतीने कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात शेकडो बस रवाना करण्यात आल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी झेंडा दाखवत कोकणवासीयांना शुभेच्छा देत त्यांना सुखरूप त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना केली.
रविवारी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथून शेकडो गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या तर आज कळवा, विटावा, खारिगाव आणि दिवा येथून २३४ बस सोडण्यात आल्या. कळवा येथील विविध भागातील ११७ गाड्यांना उपस्थित राहून भगवा झेंडा दाखवून मार्गस्थ केल्या. सर्व गणेशभक्तांशी संवाद साधून त्यांना सुखरूप प्रवासाच्या आणि गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व गणेशभक्तांनी या मोफत बस सेवेसाठी शिवसेनेचे खूप खूप आभार मानले.यावेळी शिवसेनेचे जितेंद्र पाटील, प्रियांका पाटील, प्रमिला केणी, रमाकांत मढवी, आदेश भगत, अमर पाटील, उमेश पाटील, दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, दिपाली भगत, श्याम पाटील, नरेंद्र शिंदे, निनाद बोराडे, राधेय वराडकर, उमेश भगत, चरणदास म्हात्रे, गुरुनाथ पाटील, निलेश पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.