ठाणे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर(जिल्हा) प्रणित नवयुग मित्र मंडळ व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट तर्फे स्थानिक मा. नगरसेविका स्नेहाताई आंब्रे आणि भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश बा. आंब्रे यांच्यावतीने गणरायाच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी आवश्यक पूजा साहित्य तसेच पूजा पुस्तिकांचे मोफत वाटप सोमवारी करण्यात आले. यावेळी प्रभागातील मोठ्याप्रमाणात नागरिकांनी यावेळी हजेरी लावली होती.
या उपक्रमात राकेश बोऱ्हाडे यांच्या वतीने श्री गणेश पूजन पुस्तिका वाटप करण्यात आले.सोमवारी आयोजित कार्यक्रमात ५०० गणेशभक्तांना प्रथम प्राधान्य देऊन पूजन साहित्याचे वितरण करण्यात आले. शेकडो गणेशभक्तांनी सहभाग घेतला व भाविकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हाच बाप्पाचा आशीर्वाद ठरला.अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे रमेश आंब्रे यावेळी म्हणाले.