मुंबई (प्रतिनिधी) : कन्सल्टंट फिजिशियनच्या व्यावसायिक संघटनेपैकी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया – महाराष्ट्र स्टेट चॅप्टर (एपीआय एमएससी) यांनी, जागतिक औषध निर्माण करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड यांच्या सहकार्याने, आज २९ ऑगस्ट हा “राष्ट्रीय खोकला दिन” म्हणून घोषित केला. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून, त्याचा उद्देश खोकल्याबाबत राष्ट्रव्यापी संवाद साधणे, रुग्ण आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्ये जागरूकता वाढवणे, तसेच पुराव्यावर आधारित निदान आणि उपचारांच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हा आहे.
ही तारीख डॉ. अशोक महासूर यांच्या पुण्यतिथीची आहे, जे श्वसनविकार तज्ज्ञ आणि इंडियन चेस्ट सोसायटीचे संस्थापक होते. भारतातील फुफ्फुसांच्या रोगांच्या उपचारात त्यांच्या अमूल्य योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. ‘युरोपियन रेस्पिरेटरी जर्नल’ नुसार, भारतातील जवळजवळ 30% रुग्णांनी खोकल्याला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणून नोंदवले आहे. तरीही, प्रमाणित क्लिनिकल मार्गदर्शक तत्त्वांच्या अभावामुळे चुकीचे निदान आणि अयोग्य उपचार मोठ्या प्रमाणावर होतात. राष्ट्रीय खोकला दिवस सुरू करून, एपीआय – एमएससीचा उद्देश आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्ये पुराव्यावर आधारित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि रुग्णांची स्थिती सुधारून ही गंभीर कमतरता दूर करण्याचा संकल्प असल्याचे असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया – एमएससीचे माननीय संयुक्त सचिव डॉ. अगम वोरा म्हणाले.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया – एमएससीचे सल्लागार तसेच कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉ. मंगेश तिवासकर म्हणाले, “राष्ट्रीय खोकला दिन हा दूरदृष्टी असलेला उपक्रम आहे, जो फिजिशियनसह सर्व भागधारकांना एकत्र आणतो, जेणेकरून खोकला व्यवस्थापनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नव्याने विचार करता येईल.