भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळा!
नवी मुंबई ( स्वप्नील राठोड) : राष्ट्रहित, पारदर्शकता आणि सर्वांगीण विकास हीच आपली दिशा ठरवून भाजपा सरकार सातत्याने जनतेसाठी काम करत आहे. याच कार्यशैलीमुळे असंख्य लोक भाजपाशी जोडले जात आहेत.याचाच एक भाग म्हणून बेलापूर येथील समाजसेविका छाया जाधव तसेच इतर महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यावेळी म्हणाल्या.
या प्रसंगी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करताना मंदाताई म्हणाल्या की,“भारतीय जनता पक्ष हा विकास आणि जनसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारा पक्ष आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद असून, या विश्वासाला न्याय देणे हीच आमची जबाबदारी आहे.” पक्ष प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. त्याच बरोबर प्रभाग क्र. २७ मधील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या जनसंपर्क कार्यालयामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अधिक गती मिळणार असून, जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी हे केंद्र उपयोगी ठरणार आहे.मतदारसंघातील विकास कामांची प्रचीती पाहता महिलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला महिलशक्तीचे अधिक बळ मिळणार आहे.
यावेळी माझ्या समवेत जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील,नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेता पंढरीनाथदादा पाटील, प्रमोद जोशी, नारायण मुकादम, बेलापूर राम मंदिर अध्यक्ष निलेश म्हात्रे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, दर्शन भारदवाज, माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मुकादम, मोहन मुकादम, सुधीर मुकादम, गोपालराव गायकवाड, मनोहर बाविस्कर, अर्चना भोईर, स्वाती घैसास, हरीश्चंद म्हात्रे, विज्ञान म्हात्रे, मनोज म्हात्रे, वैभव कदम, सुर्यकांत म्हात्रे, महेंद्र नाईक, राजू म्हात्रे, प्रकाश भोईर, कल्पेश कुंभार, तुकाराम कोळी, चंद्रकांत कोळी, कैलास कोळी, कल्पना शिंदे व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.