ठाणे (प्रतिनिधी) : डहाणू विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून शिवसेनेचे मुख्यनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकवण्याकरता व निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याकरिता शिवसेनेचा मेळावा डहाणू शहरातील दशश्री माळी हॉल येथे संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने व शिवसेना पक्षाची बांधणी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी, आमदार राजेंद्र गावित, राजेश शहा, उपनेते निलेश सांबरे, जगदीश घोडी, मनिषा निम्हकर, जिल्हा प्रमुख कुंदन संखे, जिल्हा संघटक वैदेही वाढण, उपजिल्हा प्रमुख समीर सागर, तालुका प्रमुख हेमंत धर्मेहेर, शहर प्रमुख राहुल घरत, शहर प्रमुख रमेश पाटील, विधान सभा संघटक डॉ. आदित्य अहिरे, उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील ईबाड, तालुका प्रमुख आशिर्वाद रिंजड, तालुका संघटक विजय माळी, डहाणू तालुका संघटक रूपजी कोल, साईराज पाटील, कुणाल पाटील, पींडू गहला, नीलम म्हात्रे, केदार काळे तसेच जव्हार व मोखाडा तालुक्यातील इतर उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, सर्व शिवसेना, महिला आघाडी व युवा सेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.