मंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नातून मंडणगड न्यायालयाला मिळाली आधुनिक व भव्य इमारत
मुंबई : संपूर्ण भारतात तालुकास्तरीय सर्वात सुंदर न्यायालय इमारत म्हणून ओळख मिळवणाऱ्या मंडणगड दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे लोकार्पण आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती. भूषणजी गवई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या प्रसंगी भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच त्यांच्या जीवनपट कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर मा. सरन्यायाधीश साहेब यांच्या हस्ते न्यायदान कक्ष आणि वकील ग्रंथालयाचे उद्घाटनही झाले.
मंडणगड न्यायालयाची इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने येथे न्यायदानाचे पवित्र कार्य होणार असल्याचा समाधानकारक भाव व्यक्त करण्यात आला. ही इमारत अवघ्या २ वर्षांच्या कालावधीत पूर्ण झाल्याबद्दल मा. सरन्यायाधीश साहेबांनी संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच बांधकाम कामगारांचे विशेष कौतुक केले व कामगारांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी नवजात बालक ते १८ वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी शासकीय योजनांची माहितीपुस्तिका व स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळ्यास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे, मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई चंद्रशेखरजी, न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई. मकरंद कर्णिक साहेब, मा. न्यायमूर्ती. माधवजी जामदार साहेब, मा. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत साहेब, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी. विनोदजी जाधव, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, मंडणगड अमृता जोशी, बार कॉसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे अध्यक्ष अॅड. अमोलजी सावंत, वकील संघ, मंडणगड चे अध्यक्ष अॅड. मिलींदजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.