• मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
Thursday, June 4, 2026
  • Login
News Disha
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म
No Result
View All Result
News Disha
No Result
View All Result
Home ठाणे

खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी समितीची स्थापना

News Disha by News Disha
December 16, 2025
in ठाणे
0
खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी समितीची स्थापना
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare On Whatsapp
Post Views: 50

ठाणे (प्रतिनिधी ) : रस्त्यावरील खड्डे, उघडी गटारे, तसेच रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटीमुळे झालेल्या मृत्यू किंवा जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना भरपाई निश्चित करुन ती वितरीत करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2025 रोजी दिले आहेत. या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका ठाणे यांची अध्यक्ष व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांची सदस्य म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

महापालिका आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव व समितीचे सदस्य रविकांत पाझरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा,विधी सल्लागार मकरंद काळे, उपनगरअभियंता ‍विकास ढोले, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच विविध प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते

.ठाणे शहरात रस्त्यावरील खड्डे, उघडी मॅनहोल्स किंवा रस्त्याच्या देखभालीतील त्रुटीमुळे नागरिकाचा मृत्यू झाला असेल अथवा जखमी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले. या प्रकरणांमध्ये समिती कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा करुन जर अपघाताचे कारण रस्त्यावरील खड्डे किंवा उघडे मॅनहोल असल्यास तक्रारदार अपघातग्रस्ताला किंवा अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकाच्या नातेवाईकांना चौकशी करुन नियमांनुसार आवश्यक ती भरपाई महापालिकेमार्फत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अपघात घडल्यानंतर तक्रारदाराने 48 तासात समितीकडे तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातांची समितीमार्फत शहानिशा करताना रस्त्याची मालकी कोणाची आहे, सदर रस्ता महापालिकेकडे हस्तांतरीत केला आहे का, तसेच अपघात ज्याठिकाणी घडला त्या संबंधित पोलीस ठाण्याने केलेला पंचनामा आदी सर्व बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. अनेकदा वाहनांची टक्कर होवून किंवा वाहनाने धडक दिल्यानेही अपघात होतात, असे अपघात वगळून केवळ खड्ड्यांमुळे झालेला अपघात व उघडी मॅनहोल्स याबाबत झालेल्या अपघातांची शहानिशा समितीमार्फत केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष सौरभ राव यांनी नमूद केले.

Tags: Road safety accident commityThane road accidentTMC
Previous Post

भाजप मुंब्रा मंडळाच्यावतीने विशेष शिबिराचे आयोजन

Next Post

महापालिका निवडणुकीत भाजपचे 44 उमेदवार बिनविरोध निवड

Next Post
चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

महापालिका निवडणुकीत भाजपचे 44 उमेदवार बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • बेरोजगारीवर मात: कौशल्य विकासातून तरुणाईला नवी दिशा – ‘न्यूज दिशा’चा विशेष अहवाल
  • मुंबईच्या वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई का नाही? एका संपादकाचे परखड मत | News Disha
  • मुंबई आणि पुणे: स्मार्ट सिटीच्या शर्यतीत कोण पुढे? विकासाचा सखोल लेखाजोखा
  • राज्यात तांडा समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

Recent Comments

  1. शरद वसंतराव भसाळे on ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता ‘पत्रकारितेची पाठशाळा’ कार्यशाळेचे आयोजन
  2. अनिल अहिरे on सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी पद्धतीने शिपाई भरती

Categories

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर

Browse by Category

  • ठाणे
  • दिल्ली
  • पुणे
  • मुंबई
  • संपादकीय
  • सोलापूर
  • About Us
  • Contact Us

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • सोलापूर
  • दिल्ली
  • गुन्हे
  • संपादकीय
  • अध्यात्म

© 2023 Mahaweb Technologies - Copyright by Mahaweb Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777