स्कॉर्पिओ विकत घेऊन सहा महिने मात्र पुन्हा नवीन गाडीचे प्रस्ताव
महागड्या गाड्याच्या प्रस्तावावरून तावडे,पेडणेकरांमध्येच जुंपली
मुंबई : मुंबईतील ट्रॅफिक जॅमचा धसका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला राणीबाग परिसरात बंगला देण्याची मागणी केली होती. यानंतर आता मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात पालिकेकडून स्कॉर्पिओ गाड्या कंत्राटदाराकडून घेण्यात आल्या होत्या, मात्र आता स्कोर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याने त्यांच्या जागी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. मात्र याप्रकरणी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आरोप केला की, मी दोन तीन गोष्टीवर प्रकाश टाकेल, कारण 54 गाड्या घेण्यात आल्या होत्या. काही गाड्या वॉर्ड अध्यक्ष आणि आयुक्तांना देण्यात आल्या. आम्हाला ज्या गाड्या दिल्या, त्यांचे अॅवरेज 7-8 आहे. तसेच गाडी बरोबर नाही, पाठ दुखते असे काहीजण म्हणत आहेत. याशिवाय गाडी मुंबईच्या बाहेर न्यायची असते, तेव्हा आयुक्तांची परवानगी लागते. मी महापौर असताना दोन वेळा गाडी बाहेर घेऊन गेले होते. आता मी गाडी बाहेर घेऊन जात नाही. मात्र अशा पद्धतीने पालिकेची लूटमार करत असतील, तर ते योग्य नाही. महापौर आयुक्तांचे लाड पुरवायला बसले आहेत का? असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला होता. मात्र किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना रितू तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
किशोरी पेडणेकर यांच्यावर थेट आरोप करताना रितू तावडे म्हणाले की, गाड्यांची मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली होती, कारण त्यांची पाठ दुखते. पण मला आश्चर्य वाटते की त्यांना बंगला चालतो, पण गाडी चालत नाही. त्यांनी मला सांगावे की, विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला आहे का? मी स्वतः माझ्या बंगल्यात साडे पाच महिन्यांनंतर गेले. त्यामुळे माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही मुंबई महापालिकेचा बंगला मागता, पण तुम्हाला गाड्यांच्या तक्रारी आहेत. ज्यांनी गाड्यांची मागणी केली आहे, त्यांची अतिशय माफक अपेक्षा आहे. पण किशोरी पेडणेकरांना महापालिकेचा बंगला चालतो, मात्र गाडी चालत नाही, अशी टीका करत रिती तावडे म्हणाल्या की, गाड्या वापरल्यानंतरच आणि त्रास जाणवल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या गाड्यांची मागणी केली आहे. किशोरी पेडणेकर यांना मुंबई महापालिकेतलं कामकाज माहीत आहे आणि मुंबईकरांना त्यांचे मागच्या 25 वर्षांचे कामकाज माहीत आहे. म्हणूनच त्या आज विरोधी बाकावर आहेत, असा टोलाही रितू तावडे यांनी लगावला.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026