ठाणे (कविराज चव्हाण) : भाजप मुंब्रा कौसा मंडळाच्यावतीने प्रभागातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, बाल संगोपन योजना, मतदान ओळखपत्र (Voter ID), संजय गांधी निराधार योजना तसेच लाडकी बहीण योजनेची e-KYC यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या शिबिरास भाजपचे ज्येष्ठ नेते संजय वाघुले यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि या यशस्वी आयोजनाबद्दल भारतीय जनता पार्टी, मुंब्रा–कौसा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी या शिबिरास माझ्यासह भाजपा मुंब्रा मंडळ अध्यक्षा नाझिया तांबोळी, कौसा मंडळ अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष हारून तांबोली, प्रशांत कळंबटे उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय वाघुले यांनी यावेळी केली.

