आमदार संजय केळकर यांच्या 'देवाभाऊ चष्मा' वाटप उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
उपक्रमाद्वारे ५,००० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी आणि चष्मा वाटप
ठाणे: मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने तसेच 'देवाभाऊ चष्मा' उपक्रमाचे निर्माते समाजसेवक शाकिब गोरे यांच्या सहकार्याने ठाणे शहरात सलग तीन दिवस भव्य नेत्रतपासणी व मोफत चष्मा वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात नागरिकांसाठी अत्याधुनिक नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नगरसेवक विकास पाटील, उषा वाघ, अमित सर, सुरेश कांबळे, नम्रता कोळी, अनिता यादव आणि कमत चौधरी यांच्या प्रभागांमध्ये हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.या उपक्रमाद्वारे ५,००० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांना मोफत 'देवाभाऊ चष्मा' वितरित करण्यात आला.
यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, "जसा महाराष्ट्रात 'देवाभाऊ' नावाचा जनकल्याणाचा ब्रँड चालला तसा ठाण्यात 'देवाभाऊ चष्मा' उपक्रमालाही नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.या शिबिरास मा. आमदार ॲड. निरंजन डावखरे, संदीप लेले तसेच अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
२० वर्षांपासून एसआरएमधील नागरिक घराच्या प्रतिक्षेत
10 Sep 2026
भूमी एकर्सचा "भूमी महाघोटाळा" ; शासनाची फसवणूक करून गोरगरीबांची घरे लाटली
09 Sep 2026
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मेजर डॉ. नितिन राठोड
08 Sep 2026
ठाण्यात बंजारा समाजाच्या भव्य तीज महोत्सवाची धूम
08 Sep 2026