Site Logo
ठाणे

गेल्या काही महिन्यांमध्ये ठाण्यात ५७ हत्या झाल्या

प्रकाशित: 09 Oct 2026, 04:56 PM
44 Views
Featured News Image

ठाणे : गेल्या काही महिन्यांमध्ये ठाण्यात ५७ हत्या झाल्या. यामध्ये पीएसआय किसन भोईर आणि आपल्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची निघृण हत्या झालीय. ज्यामुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जर आज पोलिस सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय? याच प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आणि ठाण्याला गुंडगिरीच्या विळख्यातून वाचवण्यासाठी काढलेला सर्वपक्षीय मोर्चा आता ठाणे महानगरपालिकेच्या इथून पोलीस आयुक्तालयाकडे रवाना झाला आहे. 

      या मोर्च्यात राज्यसभा खासदार कुमार केतकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार श्री. जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. केदार दिघे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज प्रधान, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. राहुल पिंगळे,धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आरपीआय पक्षाचे खांबे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर,ठाणे शहर समन्वयक श्री. संजय तरे, ठाणे शहरप्रमुख श्री. अनिश गाढवे यांच्यासह पुर्णेकर कुटुंबीय, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ठाणेकर उपस्थित होते. ठाण्याला ड्रग्स माफिया, गुंडगिरी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच प्रत्येक ठाणेकराच्या मनातील भीती दूर करून सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी आमचा हा लढा आहे.


https://chat.whatsapp.com/DwZMCdyGT960nGIeao8IaD?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: