नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ४५,००० रुपयांचा दिवाळी बोनस
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाने कामगारांच्या हिताचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. पालिकेतील कायमस्वरूपी कर्मचारी असो, कंत्राटी असो वा रोजंदारी/मानधनावरील कामगार—सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांना विनाभेदभाव एकसमान तब्बल ४५,००० रुपयांचा सण सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाच्या तत्त्वावर असा एकसमान बोनस देणारी नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.
या निर्णयाची माहिती देताना सभागृह नेते सागर नाईक यांनी सांगितले की, शहराच्या विकासात आणि स्वच्छतेत अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समर्पणाचा आणि कष्टाचा हा सन्मान आहे. या कल्याणकारी निर्णयामुळे पालिकेच्या सर्व घटकांतील हजारो कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून विविध कामगार संघटनांकडून पालिकेचे आणि प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
एक लाख आदिवासी बांधव मंत्रालयावर धडकणार
24 Oct 2026
गेल्या काही महिन्यांमध्ये ठाण्यात ५७ हत्या झाल्या
09 Oct 2026
१० ऑक्टोबर रोजी ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा
07 Oct 2026
२० वर्षांपासून एसआरएमधील नागरिक घराच्या प्रतिक्षेत
10 Sep 2026