ठाणे (कविराज चव्हाण) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मा. नगरसेवक कृष्णा पाटील तसेच नंदा पाटील यांनी गेल्या मागील काळात प्रभाग क्रमांक ११ मध्ये केलेल्या विकास कामांच्या अहवालाचे प्रकाशन ठाणे शहर आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर आमदार ॲड. निरंजनजी डावखरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.भाजप
भाजप नेते कृष्णा पाटील यावेळी म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व नगरसेविका म्हणून प्रभागातील नागरिकांच्या सेवेत आम्ही कार्यरत असताना जनतेने दिलेल्या विश्वासाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे.तसेच, गेल्या साडेतीन वर्षांपासून कोणतेही पद नसतानाही, माझी पत्नी नंदा कृष्णा पाटील व मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय राहून नागरिकांच्या समस्या, गरजा आणि प्रश्नांसाठी सदैव पुढाकार घेतला आहे.याच कार्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेसमोर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ठेवण्याच्या उद्देशाने आमच्या कार्याचा सविस्तर अहवाल आज आमदार संजय केळकर व कोकण पदवीधर आमदार ॲड. निरंजनजी डावखरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.हा अहवाल म्हणजे केवळ कामांची नोंद नव्हे, तर जनतेशी केलेल्या वचनांची प्रामाणिक मांडणी आहे.पुढील काळातही जनतेच्या सेवेसाठी अधिक ताकदीने, अधिक जबाबदारीने आणि अधिक निष्ठेने कार्य सुरूच राहणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

