Site Logo
मुंबई

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात ‘रंग निती’ आणि ‘रास उत्सव’ उत्साहात संपन्न

प्रकाशित: 16 Oct 2026, 05:11 PM
32 Views
Featured News Image

मुंबई : एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट आवार येथील विद्यापीठ परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला 'रंग निती २०२६’ आणि ‘रास उत्सव २०२६’ हा गरबा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक गरबा आणि दांडिया नृत्याच्या तालावर विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला.विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग विद्यार्थी संघटना, गुजराती विभाग, लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिंग (एल.टी. नर्सिंग कॉलेज), विद्यार्थी विकास विभाग आणि श्रीमती सिताबाई अमिजेरी गर्ल्स हॉस्टेल विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       भारतीय संस्कृती आणि पारंपरिक कलांचे जतन करण्याबरोबरच विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक एकात्मता, सहकार्य आणि बंधुभावाची भावना वृद्धिंगत करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी गरबा आणि दांडिया नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साहाची रंगत भरली. संगीत, नृत्य आणि उत्सवी वातावरणामुळे विद्यापीठ परिसरात नवरात्रोत्सवाचा आनंद अनुभवायला मिळाला.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. विविध विभाग आणि विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाने पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला.‘रंग निती २०२६’ आणि ‘रास उत्सव २०२६’ या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना एकत्र येत आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: