ठाण्यात मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रमाचे भव्य शुभारंभ
ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये झाला विद्यार्थी आणि डॉक्टरांमध्ये संवाद
ठाणे (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाचे बी एन बांदोडकर कॉलेज (ठाणा कॉलेज) येथे मुख्यमंत्री आरोग्य संवाद उपक्रमाचे भव्य शुभारंभ करण्यात आले. या उपक्रमाचे शुभारंभ महाकेअर महाराष्ट्र शासनाचे सीईओ डॉ अजय चंदनवाले यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचारतज्ञ डॉ शैलेश उमाटे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष ठाणे समन्वयक डॉ राहुल कुलकर्णी,'ठाणे वैभव'चे संपादक मिलिंद बल्लाळ, डॉ राजलक्ष्मी वालावलकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वृंदा मंजरामकर यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय कक्षाचे सदस्य पत्रकार कविराज चव्हाण आणि ठाणे कक्ष प्रमुख डॉ प्रियांका यादव यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ राहुल कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यात
आरोग्य संदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली. या संवाद कार्यक्रमात जवळपास 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या महाकेअर संस्थेचे सीईओ डॉ अजय चंदनवाले म्हणाले की, विद्यार्थी हा आपल्या देशाचा भविष्य असून त्यांनी आपल्या पालकांसोबत संवाद ठेवले पाहिजे तसेच त्यांनी सकाळी रोज एक व्यायाम किंवा मेडिटेशन केले पाहिजे.जंकफूड हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी केले पाहिजे असा सल्ला चंदनवाले यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ म्हणाले की, देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत झेन जी सहभागी होत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. देश घडवणारी ही युवाशक्ती असल्यामुळे त्यांनी आपले मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपले पाहिजे.
मानसोपचारतज्ञ डॉ शैलेश उमाटे म्हणाले की, देशात 70 मिलियन नागरिक मानसिक आरोग्याच्या विळख्यात आहेत. आपल्या देशात सामान्य व्यक्ति जवळपास 6 तास मोबाईलवर व्यस्त असल्याचे धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. अभिनेते आपल्या जाहिरातीमध्ये तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन करत असतात त्यामुळे विद्यार्थी व्यसनाकडे वळत असल्याचे काही उदाहरणे यावेळी दिली.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे ठाणे समन्वयक डॉ राहुल कुलकर्णी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजाचे आरोग्यदूत म्हणून पुढे यावे असे आवाहन केले तसेच या देशाला घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची सूचना डॉ कुलकर्णी यांनी यावेळी केली.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात ‘रंग निती’ आणि ‘रास उत्सव’ उत्साहात संपन्न
16 Oct 2026
आयडीबीआय बँक विदेशी कंपनीला विकणे देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी
16 Oct 2026
कारागृह कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिपाई भरतीत तीन टक्के आरक्षण
16 Oct 2026
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026