रोटरी क्लब ऑफ ठाणे तर्फे दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी आयोजित केलेल्या सारथी सेंटरमधील दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या यशाबाबत गौरव केला.यावेळी परवीन इंडस्ट्रीचे जनरल मॅनेजर रोटेरियन नानिक जेसवाणी, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटीचे अध्यक्ष गणेश दरेकर, सचिव साहू, सेंटर हेड अमोल धर्मे, कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, पदाधिकारी, सारथी रिसोर्स सेंटरचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि मान्यवर उपस्थित होते.
आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी समाजासमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#SarathiCentre #VisuallyImpaired #StudentAchievement #RotaryClub #NirantarDhyas #NiranjanDavkhare
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
२० वर्षांपासून एसआरएमधील नागरिक घराच्या प्रतिक्षेत
10 Sep 2026
भूमी एकर्सचा "भूमी महाघोटाळा" ; शासनाची फसवणूक करून गोरगरीबांची घरे लाटली
09 Sep 2026
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मेजर डॉ. नितिन राठोड
08 Sep 2026
ठाण्यात बंजारा समाजाच्या भव्य तीज महोत्सवाची धूम
08 Sep 2026