मुंबई (प्रतिनिधी) : आज श्रीवर्धन येथे समुद्रकिनारा वन-पर्यटन प्रकल्पाचे भूमीपूजन माझ्या हस्ते पार पडले. या समुद्रकिनारा वन-पर्यटन प्रकल्पामुळे श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळेल. तसेच यामुळे परिसरातील वनसंपदेचे संरक्षण होईल व पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात शांततापूर्ण अनुभव घेता येईल. स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आणि भारताच्या पर्यटन नकाशावर श्रीवर्धनला विशेष स्थान मिळवून देणारा हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल.या कार्यक्रमास शहरातील सर्व जेष्ठ व श्रेष्ठ मान्यवर, माजी नगरसेवक व नगरसेविका, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

