Site Logo
ठाणे

ठाण्यात बंजारा समाजाच्या भव्य तीज महोत्सवाची धूम

प्रकाशित: 08 Sep 2026, 12:46 PM
89 Views
Featured News Image

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात प्रत्येकवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील बंजारा समाजाच्यावतीने डोंगरीपाडा गणपती मंदिर सभामंडपात भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाची संस्कृती आपल्या भावी पिढीला कळावी म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या पवित्र तीजचे रोपण गेल्या आठवड्यात करण्यात आले असून रविवारी 6 सप्टेंबर 2026 रोजी विसर्जन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील तरुणींकडून बंजारा समाजाच्या संस्कृतीवर आधारित गाणी, नृत्य तरुणींकडून सादर करण्यात आली असल्याचे नायक संजय राठोड यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि ठाण्यातील बंजारा समाजाला या भव्य कार्यक्रमात सामील होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती समाजसेवक नारायण आडे यांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरीष्ठ विलास साठे, बंजारा समाजाचे ठाण्यातील प्रतिनिधी पत्रकार कविराज चव्हाण, गोदाजी राठोड, बिल्डर लहु राठोड, उद्योजक श्रवण जाधव, धनू राठोड,भाजप युवा नेते विकास राठोड, दयाराम महाराज, यांनी हजेरी लावली तर कार्यक्रमाचे आयोजन रमेश जाधव, संतोष आडे,लखन आडे, अनिल जाधव,गायक सुभाष राठोड, दत्ता जाधव, प्रदीप राठोड, दिलीप जाधव, उमेश चव्हाण, बाळू राठोड, रवी चव्हाण, जगदीश चव्हाण, विजय जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले होते. या तिज महोत्सवात बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी,अधिकारी, डॉक्टर आणि राजकीय नेते सहभागी झाले होते.

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: