११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप
ठाणे : श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल आझादनगर, चितळसर मानपाडा, ठाणे या शाळेच्या ११० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.'महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन' आणि 'राजरानी फाऊंडेशन' या दोन प्रसिद्ध सेवाभावी संस्थेतर्फे हे गणवेश देण्यात आले. 'महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन'चे अध्यक्ष, वरिष्ठ समाजसेवक महेश अग्रवाल आणि 'राजरानी फाऊंडेशन'ची अध्यक्षा रानी पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी मागसवर्गीय क्षेत्रात असलेले ४७ वर्ष जुनी श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल या शाळेत सदिच्छा भेट दिली होती.
या भेटी दरम्यान त्यांना बरेच गरजू विद्यार्थी आढळून आले होते. या विद्यार्थ्यांची अर्थिक परिस्थिती पाहून असे ११० मुली/मुले यांना गणवेश देण्याचे ठरवले होते. गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपच्या वेळी शाळेतर्फे शिप्रा डे, अभय पांडेय, रामकेर शर्मा, राजेश पांडेय आणि साधना मिश्रासह अनेक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.एकुण ११० मुली/मुलांना मोफत गणवेश वाटपानंतर संस्थेतर्फे संतोष पांडेय यांनी महेश अग्रवाल आणि राणी पांडेय यांचे विशेष आभार मानले. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026