Site Logo
मुंबई

पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक!

प्रकाशित: 02 Sep 2026, 03:08 PM
35 Views
Featured News Image

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची तरुण-तरुणींनी घेतली भेट 

मुंबई : महाराष्ट्रातील शेकडो पोलीस भरती इच्छुक तरुण-तरुणींनी मंगळवारी मंत्रालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्या मांडल्या. पोलीस भरतीमध्ये येणार्‍या अडचणी दूर करून पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांच्या मागण्या संदर्भात महाराष्ट्र शासन सकारात्मक असल्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी युवकांना दिले.वर्षानुवर्षे मेहनत करून पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या तरुणांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पोलीस भरतीचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, २०,००० हून अधिक रिक्त पदांची भरती तातडीने काढावी, तसेच PSI पदाला S-16 वेतनश्रेणी लागू करावी, यांसह विविध मागण्यांचा समावेश आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पहाटे चार वाजता उठून मैदानावर घाम गाळणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने तयारी करणाऱ्या या तरुणांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या मेहनतीला योग्य संधी मिळणे आणि 'अंगावर खाकी वर्दी चढविण्याचे स्वप्न' साकार होण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी घेतली.या तरुणांच्या भावना आणि मागण्या शासनाच्या संबंधित स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: