टीईटी पेपर लीक प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक
भिवंडी टीईटी पेपर लीक प्रकरणात मोठी कारवाई!
भिवंडी: भिवंडी पोलिसांनी महाराष्ट्र टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर लीक प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याचा सहकारी इंद्रजीत सिंग यालाही ताब्यात घेण्यात आले. या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी आज पहाटे १:०० वाजताच्या सुमारास बिहारमधून अटक केली आहे. १२ आरोपींच्या अटकेनंतर रॅकेट उघडकीस
यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणी १२ जणांना अटक केली होती. त्यांच्या सखोल चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.
पेपर लीकच्या या गंभीर प्रकारामुळे २८ जून रोजी होणारी TET परीक्षा स्थगित करावी लागली होती.आणखी अटकेची शक्यता,मुख्य सूत्रधारांच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १४ झाली आहे. भिवंडी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू असून, यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
#BhiwandiNews #TETPaperLeak #MaharashtraTET #BhiwandiPolice #PaperLeakCase #MaharashtraNews #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #tetexampreparation
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
राज्यातील कामगारांना मिळणार दर्जेदार उपचार!
10 Sep 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम
10 Sep 2026
घरच्यांच्या धाडसामुळे गर्भावातीचा जीव वाचला
10 Sep 2026
मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित
10 Sep 2026