Site Logo
मुंबई

ठाणे रेल्वे स्थानकावर परफ्यूम विकणार्‍याकडून प्रवाश्यांना मारहाण आणि लूट

प्रकाशित: 03 Aug 2026, 10:45 PM
113 Views
Featured News Image

एका प्रवाशांकडून ऑनलाईन पद्धतीने १,८०० रुपये उकळले, मागे आंदोलन झाल्यानंतर थांबली होती लूट 

ठाणे (कविराज चव्हाण ) : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात बनावट व मुदत संपलेल्या परफ्यूमची विक्री करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या समाजकंटक विक्रेत्यांचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, यापूर्वी एका तरुणीचा पाठलाग केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याचप्रमाणे प्रवाशांकडून परफ्यूमची विचारल्यानंतर विकत न घेणाऱ्या प्रवाश्यांना या फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात येत असल्याचे प्रकार प्रत्येक आठवड्यात घडत आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची लुटमार करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. गेल्यावर्षी नगरसेवक संजय वाघुले यांनी यावेळी मुदत संपलेल्या शेकडो परफ्यूमच्या बाटल्या नष्ट केल्या होत्या.

     एक वर्षांपूर्वी गावदेवी मैदानालगतच्या एका दुकानातील कामगाराला काही परफ्यूम विक्रेत्यांनी १०० रुपयांत तीन परफ्यूम देण्याचे आमिष दाखवले. पैसे दिल्यानंतर चौघा जणांनी त्याला धमकावत पुन्हा ५०० रुपये मागितले आणि ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून एकूण १,८०० रुपये उकळले. असेच प्रकार आता पुन्हा सुरू झाले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या बाजूला असणार्‍या नानासाहेब धर्माधिकारी पादचारी पुलावर पाच जणांकडून मुदत संपलेली परफ्यूम विकण्याचा धंदा पुन्हा सुरू झाला आहे. सोमवारी एका कॉलेजच्या विद्यार्थ्याने परफ्यूम विचारले आणि त्याला 100 रुपये सांगितले आणि पॅक फोडल्यानंतर त्याला एक तीनशे रुपये आणि नंतर 1200 रुपये आणि त्यानंतर जाऊन 1800 रुपये पैसे त्यांनी मागितले. त्याठिकाणी पाच जणांच्या समूहाकडून संबधित युवकाला धमकावण्यात आले आणि युवकाने पैसे देते तेथून आपला जीव या चोराकडून वाचविला. 

       उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असतानाही पोलिस, रेल्वे पोलिस, महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

#newsdisha #thane #mumbai #thanekar

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: